रोहित पवार Esakal
अहिल्यानगर

कर्जतला ऑक्सीजननिर्मिती प्रकल्प, रोहित पवारांचा पुढाकार

नीलेश दिवटे

कर्जत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी आमदार रोहित पवार यांनी घेतली. (Rohit Pawar to set up oxygen project in Karjat)

कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सीजन कमी पडू दिला नाही. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट आल्यास ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी पूर्वनियोजन करून आ. पवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून कर्जत तालुक्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी मिळाली असून तालुका ऑक्सीजन निर्मितीत आता स्वयंपूर्ण होणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढते संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रभावी व नाविन्यपूर्ण उपाययोजना आ. पवार राबवित आहेत. कर्जत येथे सुसज्ज जम्बो कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरवण्यास ते कटिबध्द राहिलेले आहेत. परिणामी कर्जतसह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णही या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत. रुग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, हाच अट्टहास असलेल्या आ. रोहित पवारांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणखी एक मोलाची कामगिरी बजावत कर्जतकरांची मने जिंकलेली आहेत. त्यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे.

भविष्यातील दृष्टीकोनातून कर्जतमध्ये उपचार घेणा-या रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा, याकरिता कर्जतमध्ये हा ऑक्सीजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. याद्वारे कर्जतमध्ये 1200 एलपीएम ऑक्सीजननिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून 250 ऑक्सीजन सिलेंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. हवेतून ऑक्सीजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे.

कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या करमाळा, परांडा, भूम, दौंड, बीड, कडा व आष्टी या भागातून उपचारासाठी येणा-या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांनी सद्यपरिस्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केल्याने सर्वच रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.

“कोरोनाच्या या दुस-या लाटेत ऑक्सीजनच्या कमरतेमुळे सर्वच वैद्यकीय यंत्रणांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. येत्या काळात कर्जत व जामखेड तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा या नियोजनातून कर्जत जामखेडमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनर जिल्हा प्रशासन व महाविकास आघाडीचे आभार.

- आमदार रोहित पवार,कर्जत जामखेड.

(Rohit Pawar to set up oxygen project in Karjat)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT