Rohit Pawar visited Covid Center at Karjat.jpg 
अहिल्यानगर

आ. रोहित पवारांनी स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या ३०० रॅमिडीसीविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.

नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास ५००० एन-९५ मास्क तर कर्जत-जामखेडसाठी ५००० एन-९५ मास्क पाठवण्यात आले आहेत. तसेच  कोरोना रुग्णांसाठी लागणारे पन्नास ऑक्सिजन सिलेंडर कर्जत जामखेड मतदारसंघासाठी दिलेले असून त्यात कर्जत व जामखेडसाठी प्रत्येकीसाठी २५ आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आ. रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी ३५० अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जत जवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असून जामखेड येथेही ३०० बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन !

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताअभावी कुणालाही आपला जीव गमावू लागू नये, यासाठी राज्यातील युवकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान करावे, असे आवाहन आ.रोहित पवारांनी सोशल मिडियावर केले आहे. स्वतः रक्तदान करत त्यांनी दिलेला हा संदेश युवकांना प्रेरित करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT