Rohit Pawar's tweet about Amrita Fadnavis
Rohit Pawar's tweet about Amrita Fadnavis 
अहमदनगर

अमृता फडणवीसांना रोहित पवार म्हणाले, ताई तुम्ही संधीचा योग्य फायदा घेतला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते अॅक्टीव असतात. कोणत्या कामानिमित्त एखाद्या अधिकाऱ्याला भेटले किंवा कोणते काम मंजूर झाले याविषयीही ते सातत्याने लिहित असतात.

देशातील राजकारणावरही त्यांचे भाष्य असते. सामाजिक प्रश्नावरही आवाज उठवतात, तर कधी मुलांसोबतचे लडिवाळ क्षणही ते शेअर करतात. राज्यभर असलेले त्यांचे फॅन रिट्विट किंवा फेसबुक पोस्ट शेअर करीत असतात. 

जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी काल दोन ट्विट केली आहेत. एक आहे पश्चिम बंगालच्या ममतादीदींबद्दल तर दुसरे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्याबद्दलचे.

ममतादीदींबद्दल ते म्हणतात, त्या पश्चिम बंगालच्या वाघीण आहेत. खऱ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

अमृता फडणवीस यांना टॅग केलेल्या ट्विटमध्ये ते लिहितात, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना संधी मिळते ते संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. ताई तुम्ही गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदरच वाटतो, अशीच आवड जोपासा, आपल्याला मनापासून शुभेच्छा.

अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या छंदाबद्दल सर्वांना माहिती आहे. कधी कधी त्यांना ट्रोलही व्हावे लागते. परंतु त्या ट्रोलरला भीक घालीत नाहीत. प्रसिद्धी अभिनेता बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांनी गाणं गायलं आहे. त्या राजकीय भाष्यही करतात. सध्या त्यांचे एक गाणे आले आहे. कोणी म्हणाले, वेडी कुठली...अशा आशयाचे त्याचे बोल आहेत. सोशल मीडियात या गाण्याची चर्चा आहे.                       संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT