tenkar palti 
अहिल्यानगर

Video : घाटात उलटला डिझेलचा टँकर...मग फुकटे धावले भांडी घेऊन...!

सकाळ वृत्तसेवा

नगर : कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर आज सकाळी करंजी घाटात अवघड वळणावर परभणीकडे जाणारा डिझेलचा टॅंकर उलटला. त्यामुळे हजारो लिटर डिझेल रस्त्यावर वाहिले. डिझेल भरण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती. 

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर आज सकाळी पाथर्डी तालुक्‍यातील करंजी घाट येथे अवघड वळणावर डिझेल नेणारा टॅंकर उलटला. चोवीस हजार लिटर डिझेल घेऊन टॅंकर वसमत, परभणी येथे डिझेल घेऊन चालला होता. आज सकाळी करंजी घाटातील अवघड वळणावर चालकांचा ट्रकवरील ताब्यात सुट्यानंतर टॅंकर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाला. त्यामुळे हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडले.

घटनेची माहिती मिळताच करंजी परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रस्त्यावर डिझेलचा पाट वाहत होता. अनेकांनी ड्रम, बॉटल आणून रस्त्यावर वाहणारे डिझेल भरून नेले. डिझेल भरून नेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात टॅंकरचालक बाळासाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता. आष्टी) सुदैवाने बचावला असून, त्याला चांगलाच मुक्का मार लागला आहे. घटनेची माहिती समल्यानंतर पाथर्डी पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT