Saint Luke Covid Center was in trouble due to lack of funds 
अहिल्यानगर

संत लुक कोविड सेंटर निधीअभावी आले अडचणीत

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः शहरातील संत लुक रुग्णालयातील कोरोना उपचार विभाग निधीअभावी अडचणीत आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करणे अवघड झाल्याने रुग्णालय संचालकांनी स्थानिक प्रशासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधीअभावी उपचार सुविधा बंद करण्याची वेळ आल्याची माहिती रुग्णालयाने प्रशासनाला कळविली आहे. 

स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी संतलुक रुग्णालय ताब्यात घेतले. रुग्णालयातून आतापर्यंत 600 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचार सुविधांसाठी निधीची आवश्‍यकता आहे.

सध्या कोरोना विभाग वगळता इतर उपचार सुविधा बंद असल्याने रुग्णालयासाठी मिळणारे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे कामगारांच्या पगारासह उपचार सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संतलुक रुग्णालयाने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली. 

संतलुक व्यवस्थापनाशी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांची नुकतीच बैठक झाली. बैठकीनंतर निधीबाबत आमदार लहू कानडे यांनी जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याचे समजते. 

तहसीलदार पाटील म्हणाले, की संतलुक रुग्णालयाने रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून लवकरच रुग्णालयासाठी निधी उपलब्ध होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांची नोंदणी करून निधीची व्यवस्था केली जाईल. जिल्हा आरोग्य विभागाकडूनही निधीबाबत कार्यवाही सुरू आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT