Suraj Pawar सकाळ
अहिल्यानगर

Suraj Pawar : सैराट फेम सूरज पवार चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल

सकाळ डिजिटल टीम

राहुरी : मंत्रायलयात नोकरी लावण्याच्या आमिषाने सैराट फेम सूरज पवार आणि त्याच्या सहकाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार सूरज पवार उर्फ प्रिन्स चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

(Sairat Suraj Pawar Latest News)

दरम्यान, सूरज पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात महेश वाघडकर या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. मंत्रालयात नोकरी लावून देतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याने केला असून पोलिसांनी सूरज पवार याला नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर येत्या सोमवारी पुन्हा त्याला याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (रा. संगमनेर ) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती असा आरोप फिर्यादीने केला होता. त्यानुसार फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT