Sakal exclusive sakal
अहिल्यानगर

Sakal exclusive : लिंबातून वर्षाला चार लाखांचे पॅकेज

लोणीव्यंकनाथमधील शेतकऱ्याची यशोगाथा; मालाला मोठी मागणी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्यात लिंबाचे क्षेत्र तुलनेत कमी झाले आहे. परवडत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागा काढल्या आणि दोन वर्षात याच लिंबाला चांगला दर मिळतोय. लोणीव्यंकनाथ येथील प्रगतशील शेतकरी दिलीपकाका काकडे यांच्याकडे असणाऱ्या दीड एकर (२३४ झाडे) क्षेत्रातील लिंबू बाग चांगले उत्पन्न देत आहे. बागेची चांगली जपवणूक केल्याने त्यांना वर्षाला चार ते साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न लिंबातून मिळतेय.

लोणीव्यंकनाथ येथील दिलीप काकडे व त्यांच्या पत्नी शैला हे दांपत्य उच्चशिक्षीत असले तरी अठरा एकर शेतातील व्यवस्थापन दोघेही स्वत:च करतात हे विशेष आहे. जुन्या काळातील त्यांचे हे शिक्षण त्यावेळी नोकरी लागणारे होते. मात्र दोघांनीही वडीलोपार्जीत शेतीतून सोने काढण्याच्या उद्देशाने झोकून दिले. त्यांची मुले व सुना उच्चशिक्षीत असून, शहरात नोकरी करीत आहेत.

दिलीप काकडे हे नागवडे कारखान्याने माजी संचालक, गावचे माजी उपसरपंच राहिले आहेत. गेल्या काही वर्षात शेतातून उत्पन्न मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग ते करीत आहेत. त्यांच्याकडे उसासोबत कांदा व लिंबू हे तीनच पिके आहेत. सध्या त्यांच्या लिंबाला चांगली मागणी असून आठवड्यात सुमारे सातशे ते आठशे किलो लिंबू शेतातून व्यापारी घेवून जातात. सध्या लिंबाला साठ रुपयांच्या आसपास दर मिळत असून हाच दर काही दिवसांपुर्वी शंभराच्या घरात होता.

काकडे म्हणाले, लिंबू पिकाचे व्यवस्थापन चांगले केले व ही बाग जपली तर त्यातून हमखास पैसाच मिळतो. बहाराचे नियोजन करताना निसर्गाची साथही आवश्यक असते. बागेसाठी आळस न ठेवता किटकनाशके, टाॅनिक, शेणखते याचे नियोजन चांगले केले तर लिंबातून चांगला पैसा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT