Sambhajinagar of Aurangabad and Ambikanagar of Ahmednagar 
अहिल्यानगर

औरंगाबादचे संभाजीनगर तर अहमदनगरचे अंबिकानगर, नामकरणासाठी शिवसेना खासदारांनी खाल्ली उचल

अशोक निंबाळकर

अहमदनगर ः नववर्ष नवा राजकीय वाद घेऊन येत आहे. सध्या औरंगाबादच्या नामकरणाचा विषय गाजत आहे. या वादात शिवसेनेच्या शिर्डीतील खासदारांनी उडी घेतली आहे. अहमदनगरच्या नामकरणाबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.

औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली. 

औरंगाबादमध्ये शहराच्या नामकरणावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. नामकरणाबाबत कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधकांनी शहराची नावे बदलण्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे पहावे, असे ते म्हणाले होते. तोच धागा पकडून शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी नगरबाबतही वक्तव्य करून नवीन वादाची ठिणगी टाकली आहे. 

ते म्हणाले, की औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, ही जनतेची मागणी आहे. ते अपेक्षितच आहे. या बाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. परंतु औरंगाबादबरोबरच अहमदनगरचेही नामकरण करून "आंबिकानगर' असे व्हावे, अशी आमची मागणी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष; आज १७ पैकी ११ जागांचे निकाल

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

SCROLL FOR NEXT