Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 22 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

कौडण्यपूरच्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती मध्ये जंगी स्वागत

महाराष्ट्रातील 432 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुख्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील माता रुख्मिणीची पालखी आषाढी एकादशी करिता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.यावेळी माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावती शहरात चार दिवसानंतर आगमन झाले, अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पालखीचा जंगी स्वागत करण्यात आलं

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com