Samruddhi Mahamarg Accident sakal
अहिल्यानगर

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार

नांदेडहून मुंबईकडे जाणारी कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणारी कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार झाला आहे.

अपघात इतका भयानक होता की, कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात धोत्रे गावाजवळ आज (रविवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. मोहम्मद जावीद अख्तर मोहम्मद सलिमोद्दीन (वय ५५), अरकुमुद्दीन जावीद अख्तर (वय २२), शामीमबेगम मोहम्मद जावीद अख्तर (वय ३६, सर्व रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.

सदर कुटुंब मूळ नांदेडचे असून, व्यवसायानिमित्त ते मुंब्रा येथे वास्तव्यास आहे. बकरी ईद साजरी करण्यासाठी ते नांदेडला आले होते. परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात घडला. भरधाव कारवरील (एमएच- ०४ जेव्ही २४३०) नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मृतदेह कारमधून काढण्यात आले. त्यानंतर ते उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

तालुक्यातील कोकमठाण येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी टेम्पोला कारने मागून धडक देऊन पती-पत्नीसह एक लहान मुलगी ठार झाल्याची घटना ताजी असतानाचा हा दुसरा अपघात घडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT