Samrudh Gaon Sankalp Rohit Pawar on Gudi Padwa ahmednagar Team esakal
अहिल्यानगर

समृद्ध गावांत उभारणार श्रमदानाची गुढी; रोहित पवार

कर्जत-जामखेडमध्ये दृढ होतेय प्रथा; रोहित पवार यांचा पुढाकार

वसंत सानप

जामखेड : गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्ताचा एक दिवस. यानिमित्त अनेक जण शुभकार्य वा नवीन व्यवसाय या मुहूर्तावर सुरू करतात. कर्जत-जामखेडमध्ये मात्र आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध गाव संकल्प 2.0’ चा प्रारंभ होत आहे. या वर्षी कर्जत-जामखेड तालुक्यांतील अठ्ठावीस गावांमध्ये श्रमदानाची गुढी उभारली जाणार आहे. यामध्ये दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी चौदा गावांचा समावेश आहे.

आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात ‘समृद्ध गाव’ संकल्पना राबवली जाते. यामध्ये आध्यात्मिक, शिक्षण, महिला व बालविकास, जल संधारण, वृक्ष लागवड, मूलभूत सुविधा, आरोग्य अशा सात विषयांवर लोक सहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने ग्राम समृद्धीचा संकल्प पुढे नेला जातो आहे. हा उपक्रम आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राबविला जात असला तरी निश्चित केलेल्या गावामधील ग्रामस्थही याकरिता सज्ज असतात. त्यामुळे हा उपक्रम ही यशस्वी होतो. याचा प्रत्यय मागील वर्षी आला आहे.

गुढी पाडव्याचे औचित्य साधून, समृद्ध गाव संकल्प 2.0 मधील सहभागी गाव बारामतीमध्ये साडेतीन दिवसीय ट्रेनिंग घेतलेले अठ्ठावीस गावं यात सहभागी होणार आहेत.गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिथे श्रमदान करायचे तिथे गुढी उभारायची. या गुढीला गावात समृद्धी नांदू दे ही प्रार्थना करीत श्रमदानाला सुरवात करीत पुढील वर्षभर हा उपक्रम गावात राबवतात. मागील वर्षी याचं माध्यमातून, अनेक गावांनी उत्कृष्ट काम केली. यावेळी ही 28 गावे, ही याच प्रकारे उत्कृष्ट कार्य करून गाव समृद्ध करतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.या 28 गावांतील श्रमदानाच्या गुढीचे पूजन आमदार रोहित पवारांचे पिताश्री राजेंद्र पवार, मातोश्री सुनंदा पवार व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी गुढीपाडवा दिनी करणार आहेत.

या गावांचा सहभाग

जामखेड तालुक्यातील डोणगाव, पाडळी, मोहा, कोल्हेवाडी, नाहुली, देवदैठण, राजुरी, पिंपळगाव आळवा, लोणी, वाकी, जातेगाव, दिघोळ, मुंगेवाडी, जायभायवाडी. तर कर्जत तालुक्यातील भांबोरा, दगडी बारडगाव, बेनवडी, कोळवडी, वडगाव तनपुरा, कोपर्डी, भोसे, खांडवी, चांदे बुद्रुक, कोंभळी, घुमरी, टाकळी खांडेश्वरी, आखोणी, डोंबाळवाडी या गावांचा समावेश आहे.

गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिथे श्रमदान करायचे, तिथे गुढी उभारायची. या गुढीला गावात समृद्धी नांदू दे ही प्रार्थना करीत श्रमदानाला सुरवात करून, पुढील वर्षभर हा उपक्रम गावात राबवायचा. मागील वर्षी याच माध्यमातून, अनेक गावांनी उत्कृष्ट काम केली. यावेळी या 28 गावांतही चांगले काम होईल. श्रमदानाच्या गुढीचे पूजन पिताश्री राजेंद्र पवार, मातुःश्री सुनंदा पवार, ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी गुढी पाडव्याला करतील.

- आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT