Sangamner again large number of corona patients 
अहिल्यानगर

संगमनेर पुन्हा कोरोनाच्या रडावर, साडेसातशे रूग्ण

आनंद गायकवाड

संगमनेर ः कोरोनाने पुन्हा संगमनेरच्या दिशेने तोंड वळवले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण संगमनेरमध्ये सापडायचे. त्या आठवणी पुन्हा या वर्षी जाग्या झाल्या आहेत. नगर शहरापाठोपाठ संगमनेरमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने शासकीय व 28 खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने 969 रुग्णांवर उपचारांची व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत 150 खाटांच्या अतिदक्षता विभागासह 332 ऑक्‍सिजन, 38 व्हेंटिलेटर व 228 सामान्य खाटाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

सध्या तालुक्‍यातील 748 रुग्ण उपचार घेत आहेत. 138 जणांना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अद्याप 221 खाटा शिल्लक आहेत. अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व राहाता तालुक्‍यांतील सुमारे 25 रुग्ण संगमनेरात उपचार घेत आहेत. याशिवाय लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी तालुक्‍यातील 14 ठिकाणी व्यवस्था केली असून, सद्यःस्थितीत तेथील साडेसातशे खाटा शिल्लक आहेत. 

रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकून राहावे, यासाठी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम तालुक्‍यातील चौदा विलगीकरण कक्षांसह 29 ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष बाधित रुग्ण आणि आरोग्यसेवकांशी संवाद साधत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT