Sangamner College became autonomous, this is an opportunity for students 
अहिल्यानगर

संगमनेर कॉलेज झाले स्वायत्त, विद्यार्थ्यांना ही आहे संधी

आनंद गायकवाड

संगमनेर ः  नॅक या राष्ट्रीय मुल्यांकन संस्थेकडून प्राप्त झालेल्या अ+ (सीजीपीए 3.58 ) या नामांकनाच्या निकषावर नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने, शैक्षणिक संगमनेर महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला आहे. हा बहुमान मिळवणारे संगमनेर हे जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय ठरले आहे.

या यशात शिक्षण प्रसारक संस्था व महाविद्यालयाचा प्रत्येक घटक महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी काढले.

ते म्हणाले, यापूर्वी भारत सरकारचा तारांकीत महाविद्यालयाचा बहुमान मिळालेल्या या विद्यालयाच्या स्वायत्त दर्जामुळे जागतिक दर्जाचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे जागतिक व औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावणार आहे. तसेच महाविद्यालय व औद्योगिक जगतातील दरी निश्‍चितच कमी होऊन नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त होण्यामागे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोलाची भूमिका आहे. स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून सद्य अभ्यासक्रमात सुसंगत बदल करून, अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयास मिळणार आहे.

व्यवसाय निगडीत व स्थानिक गरजांनुसार रोजगाराभिमुख, कौशल्याधिष्ठित नवनवीन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विविध औद्योगिक समूहांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देणे शक्य होणार आहे.

सर्वांगीण विकास, अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता व परीक्षांचे निकाल वेळेत लावणे ही स्वायत्त महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.

माफत शुल्कात दर्जेदार सुविधा

स्वायत्त महाविद्यालयांना आर्थिक स्वायत्तता असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रसारक संस्थेने विद्यापीठाच्या नियमानुसार शुल्क आकारण्याचा ठराव केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना माफक दरात दर्जेदार शिक्षण घेता येईल असेही डॉ. मालपाणी यांनी सांगितले.

डिग्रीवर विद्यापीठ, कॉलेजचे नाव

या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठ व महाविद्यालयाचे नाव येते. विद्यापीठातील विविध योजना, सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या स्पर्धा, राज्य व केंद्र सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांव्यतिरिक्त गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रसारक संस्थेच्या विद्याधन कलश योजनेतून आर्थिक सहाय्य मिळते.

कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीची संधी

कॅम्पस इंटरव्ह्युमधून इतर महाविद्यालयांच्या तुलनेत नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देता येते अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी दिली.

महाविद्यालयाची वैशिष्ट्य़े 

बदलत्या काळानुरुप भविष्यातील संधी हेरुन नाविन्यपूर्ण उपक्रमांची रचना. व्यवसायाभिमुख व कौशल्याधिष्ठित पाठ्यक्रमांचे महत्व लक्षात घेऊन युजीसीकडून व्होकेशनल अंतर्गतपदवीचे सात व पदव्युत्तरचे दोन असे नऊ रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवले जातात.

या अनुषंगाने महाविद्यालयाच्या 50 एकरच्या क्षेत्रात सुसज्ज प्रयोगशाळा, सेमिनार हॉल, दहा विभागांमध्ये एम.फिल, पी.एचडी संशोधन केंद्र, 1 लाख 21 हजार ग्रंथसंपदा असलेले समृद्ध ग्रंथालय, डेलनेट, ई जर्नल, ई बुक डाटा आदी सुविधा दिल्या जातात.

वाय फाय, स्मार्ट क्लासरुम, मुला मुलींची स्वतंत्र व सुसज्ज वसतीगृहे, प्लेसमेंट सेल, ई-सुविधा केंद्र, जिमखाना, 400 मीटर व आठ लेनचा ट्रॅक, 27 विविध क्रीडा प्रकारांच्या सुविधा, योग व निसर्गोपचार केंद्रामार्फत विविध अभ्यासक्रम चालवले जातात. 

  • या सुविधा मिळतील
  • 1) अंतर्गत व बाह्य मूल्यमापनाच्या विविध पद्धती अवलंबिण्यात आल्याने अधिक पारदर्शकतेमुळे बुध्दीमत्तेला न्याय मिळतो.
  • 2) कमी कालावधीत निकाल जाहीर होऊन विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी शिक्षणासाठी वेळेत प्रवेश घेणे शक्य होईल.
  • 3) प्रत्येक स्वायत्त महाविद्यालयामध्ये गुणवत्तेचे नियंत्रण राखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतर्गत समिती ( एपीईसी ) असते. या व्यतिरिक्त स्वायत्त महाविद्यालयाचे संचालक मंडळ व विद्यापरिषद यांचे शैक्षणिक मुद्यांवर बारकाईने लक्ष असते. विद्यापीठाची समिती दर तीन वर्षांनी परीक्षण करून प्रश्‍नपत्रिका, विद्यार्थ्यांची उपस्थिती, परीक्षा पद्धती आदी प्रक्रियांचा आढावा घेते.
  • 4) विद्यार्थ्यांना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी प्रकारच्या शिष्यवृत्तींचा लाभ मिळतो.
  • 5) शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष दर्जा असलेले महाविद्यालय म्हणून पाहिले जाते. शासन व इतर माध्यमातून येणार्‍या निधीचा ओघ जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे उच्च दर्जाच्या आधुनिक शैक्षणिक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
  • 6) या महाविद्यालयातून इतर स्वायत्त महाविद्यालयात प्रवेश हस्तांतरित करण्याची सुविधा आहे.
  • 7) सर्व समित्यांवर विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व विद्यापीठ यांचे प्रतिनिधी शैक्षणिक गुणवत्ता, विकास व आर्थिक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले जातात व त्यांच्यामार्फत नियंत्रण केले जाते.
  •  
  • संपादन - अशोक निंबाळकर
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT