In Sangamner the corona began to grow again
In Sangamner the corona began to grow again 
अहमदनगर

संगमनेरमध्ये कोरोना पुन्हा लागला वाढीला

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्‍यातील कोविड रुग्णसंख्या वाढली आहे. रोज सरासरी 40 रुग्ण आढळत आहेत.

त्यातच शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील हा 46वा बळी आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 
गेल्या महिन्याच्या सुरवातीला तालुक्‍यातील रुग्णांची संख्या आटोक्‍यात येत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते.

शहरातील रुग्णसंख्याही खालावल्याने, शहरवासीयांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत होती.

या काळात सलग पंधरा दिवस रोज सरासरी 38.27 या वेगाने रुग्णवाढ झाली. डिसेंबरच्या सुरवातीपासूनच रुग्णसंख्येने चाळिशी पार केली आहे. 

तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या गुरुवारी पाच हजार 326, तर मृत्यूंची संख्या 46 झाली आहे. नागरिक मात्र नियम पाळताना दिसत नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT