संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळणे. तसेच जलप्रदुषण होवू नये या उद्देशाने, शासकिय नियमांचे पालन करण्यासाठी संगमनेरच्या प्रशासनाने शहरातील सात ठिकाणी कृत्रिम हौद तयार केले आहेत. याबरोबर 25 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. यंदा कोणालाही थेट नदीपात्रात जावून गणेश विसर्जन करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
देशासह राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. संगमनेरातही तेराशे रुग्ण आढळल्याने, प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारद्वारा देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. घरगुती गणपती मूर्तींचे संकलन करण्यासाठी प्रभागनिहाय कार्यान्वित करण्यात येणाऱ्या संकलन केंद्रावर विसर्जनाच्या दिवशी मूर्ती देता येतील. सर्व मूर्ती एकत्रित केल्यानंतर पालिकेच्यावतीने त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.
शहरातील जनतानगर प्राथमिक शाळा मैदान, जाणता राजा मैदान, रंगारगल्लीतील रणजीत स्पोर्टस् मैदान, साटम मठ, चंद्रशेखर चौकातील बालमघाट, भारत चौकातील शाळा नं. 1, नेहरु उद्यान जलकुंभ, पोफळे मळा, बी. एड्.कॉलेजजवळ या सात ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहराजवळच्या ग्रामीण भागासाठी चंद्रशेखर चौक, जयहिंद सर्कल, मालदाड रोड, गणेश उद्यान, गणेशनगर, चव्हाणपूरा, रंगारगल्ली, इंदिरानगर, बस स्थानकासमोर, मालपाणी विद्यालयाजवळ, अकोले रोड, नेहरु चौक, आशीर्वाद पतसंस्थेजवळ, शिवाजीनगर, बी.एड्.कॉलेजसमोर, कॅ.लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, स्वातंत्र्य चौक, भूमि अभिलेख कार्यालयाजवळ व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच घुलेवाडी परिसरातील गणेशमूर्ती संकलनासाठी गणेशविहार, मालदाड रोड, शंकर टाऊनशिप, मालपाणी नगर, घुलेवाडी गावठाण, गुंजाळवाडी व ढोलेवाडी परिसरासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, हॉटेल सुप्रिमजवळ, रहाणे मळा, केशवनगर, गोल्डन सिटी प्रवेशद्वार, ढोले पाटील लॉन्स, ढोलेवाडी, शारदा बेकरीजवळ, निर्मलनगर तसेच संगमनेर खुर्द परिसरातील मूर्ती संकलनासाठी मॅथॅडिस्ट चर्च चौक, यशवंतनगर, वैदूवाडी या केंद्रावर प्रशासनाच्यावतीने मूर्ती संकलन केले जाणार असून घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती याच केंद्रांवर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादन : सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.