महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Mumbai Pune Expressway missing link project: मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. उजव्या आणि डाव्या बाजूचे पूल भाग यशस्वीरित्या जोडले गेले आहेत. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mumbai Pune Expressway missing link project

Mumbai Pune Expressway missing link project

ESakal

Updated on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. बहुप्रतिक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाशी संबंधित एका अभियंत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. त्याच्या उद्घाटनामुळे मुंबई आणि पुण्यातील अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com