अहिल्यानगर

Water Scarcity: संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊस; तरीही या तालुक्यातील १६ गावे, ५५ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकर सुरू

Rain News: भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sangamner Latest News

संगमनेर : तालुक्यात रिमझिम पाऊस वगळता अद्यापही धुव्वादार पाऊस झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाई हटण्याचे काय नाव घेईना. परिणामी आजही १६ गावांसह ५५ वाड्या-वस्त्यांवर १३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे अद्यापही कोरडेठाक पाहावयास वास्तव चित्र पाहवयास मिळत आहे.

जून, जुलै हे दोन महिने संपून ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी अद्याप संगमनेर तालुक्यात धुव्वादार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे कोरडेठाक आहे. रिमझिम पावसामुळे खरीपाची पिके अतिशय चांगली आली आहे. जर धुव्वादार पाऊस झाला नाहीतर लवकरच भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.

तर दुसरीकडे पोखरी बाळेश्वर, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, कौठे मलकापूर, पानोडी, निमोण, नान्नज, निमगाव जाळी, पारेगाव बुद्रुक, सायखिंडी या गावांसह हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवरही अद्याप धुव्वादार पाऊस झाला नाही.

तेरा टँकरव्दारे आजही या गावांसह वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे मुळा व प्रवरा या दोन्ही नद्या तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे आजही वरील गावे तहानलेलीच पाहवयास मिळत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे काही शेतकर्‍यांच्या बोअरवेल, विहिरींची पाणीपातळी थोड्याफार प्रमाणात वाढली आहे. पण ते पाणी जास्त काळ टिकू शकत नाही.

त्यासाठी तालुक्यालाच दुष्काळ हटण्यासाठी धुव्वादार पावसांची गरज आहे. तेव्हाच खऱ्याअर्थाने सोळा गावांसह पंच्चावन्न वाड्या-वस्त्यांचे टँकर बंद होतील. अन्यथा पाऊस झाला नाहीतर तर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावल्याशिवाय राहणार नाही.

मध्यंतरी तालुक्यात झालेल्या भीज पावसामुळे काही गावांसह वाड्या-वस्त्यांवरील विहिरी, बोअरवेल यांची काही प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे अशा २१ गावांसह ७६ वाड्या-वस्त्यांचे पिण्याच्या पाण्याचे टँकर पंचायत समितीने बंद केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत १६ गावे आणि ५५ वाड्यांना तेरा टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. जर धुव्वादार पाऊस झाला तर टॅंकर सुरू असलेल्या गावांचीही पाणी प्रश्न मिटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT