sanjay gandhi niradhar yojana 50 percent increase in subsidy now get 1500 rs 2 lakh beneficiaries  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : संजय गांधी निराधार योजना; अनुदानात पन्नास टक्क्यांनी वाढ, आता १५०० मिळणार

जिल्ह्यात सव्वादोन लाख लाभार्थी; दारिद्र्य रेषेखालील यादीत व्यक्तींना ६५ वर्षांपुढील व्यक्तीस लाभ

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात ५० टक्के वाढ होणार आहे. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते.

जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ८६८ लाभार्थ्यांना लाभ मिळेल. याचबरोबर एचआयव्ही, क्षयरोग, कुष्ठरोग, पक्षाघात (अर्धांगवायू) यांसह गंभीर १४ आजारांच्या रुग्णांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासन पुरस्कृत सामाजिक अर्थसाहाय्य योजनेतून समाजातील विविध दुर्बल घटकांतील व्यक्तींना अर्थसाहाय्य दिले जाते. विधवा, अपंग (दिव्यांग), परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटीत अशा १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून लाभ दिला जातो.

६५ वर्षांपुढील व्यक्तींना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. केंद्र शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजनेतून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना’ राबविली जाते.

दारिद्र्य रेषेखालील यादीत व्यक्तींना ६५ वर्षांपुढील व्यक्तीस लाभ दिला जातो. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विधवांसाठी आहे. ४० ते ७९ वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत समाजातील इतर उपेक्षित घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तृतीयपंथी व्यक्तींनाही योजनेचा लाभ दिला जातो. एचआयव्ही, क्षयरोग, कुष्ठरोग, पक्षाघात अशा गंभीर १४ आजाराच्या रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. कोरोना आजारामुळे निराधार झालेल्या मुलांचाही विशेष बाब म्हणून या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे.

- विशाल नाईकवाडे, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना

जिल्ह्यातील लाभार्थी संख्या

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना - ५४ हजार ३७१

  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन - १ लाख २५ हजार ३७७

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना - ३९ हजार ७७७

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना - २ हजार २५०

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना - ९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT