Satyajit Tambe hugs Paramvir Pandule of Mirajgaon  Sakal
अहिल्यानगर

तांबे, पांडुळेच्या गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

सकाळ डिजिटल टीम

मिरजगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे व मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांची नुकतीच बेलगाव (ता. कर्जत) येथील एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीत तांबे आणि पांडुळेंनी एकमेकांची घेतलेली गळाभेट येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.

मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य राहिलेले पांडुळे काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, त्यांचे जनसंपर्क वाढविण्याचे काम सुरूच होते. मिरजगाव जिल्हा परिषद गटात त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय झालेले दिसते. पांडुळेंची आमदार रोहित पवार यांच्यासोबत असणारी जवळीकही सर्वश्रुत आहे. अशातच तांबेंच्या सोबत झालेल्या या भेटीत दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबद्दलची चर्चा सर्वत्र रंगताना दिसते.

सत्यजित तांबे हे माझ्या कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय वाटचालीत नेहमी पाठीशी राहिले आहेत. आमची ही भेट राजकीय नसून वैयक्तिक विषयावर या भेटीत चर्चा झाली. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये.

- परमवीर पांडुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT