School started in Takli Khatgaon in Nagar district 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यातील टाकळी खातगावमधील शाळा सुरु

केशव चेमटे

भाळवणी (अहमदनगर) : सरकारच्या आदेशानुसार आजपासून शाळा प्रारंभ झाला. सकाळ सत्रातील शाळा साडेसात वाजता सुरु झाल्या. आज अनेक पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आले होते. सध्या बसचा प्रश्न असल्याने अनेक विद्यार्थी सायकल, मोटरसायकलवरून शाळेला आले.

शाळेने कालच सर्व वर्ग निर्जंतुकीकरण केले होते. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांचे तापमान तपासले तसेच सॅनीटाझरने हात साफ केले. वर्गात सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात आले होते. नियमितपणे शास्र व गणित विषयाचे तास घेण्यात आले. यावेळी प्राचार्य साहेबराव कुलट, उपप्राचार्य संजय दुधाडे, प्रा. संतोष दळवी, प्रा. योगेश घोडके, प्रा. विलास वैराळ, प्रा. मच्छिंद्र साबळे, प्रा. दिलीप बाक्षे आदींनी विद्यार्थ्यांची तपासणी करून तापमानाची नोंद करण्यात आली. 

शासनाने पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत संमतीपत्रक बंधनकारक केले आहे. संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्यांना शालेय आवारात प्रवेश दिला नाही. ॲॉफलाईन व ॲॉनलाईन शिक्षण  सुरु ठेवण्याचे निर्देश असल्याने दोन्ही वर्ग चालवताना कसरत करावी लागणार आहे. सर्व चित्र सुरळीत होण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याचे प्राचार्य साहेबराव कुलट व उपप्राचार्य संजय दुधाडे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT