Schools opened in Parner but students did not come 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये शाळा उघडल्या पण विद्यार्थी येईनात

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्‍यातील अनेक शाळांतील शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. मात्र, चाचणीनंतर आठवडा उलटूनही अनेकांचे अहवाल आलेले नाहीत. शिवाय अनेक पालकांनी संमतीपत्र न दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्यच आहे. पालकांची संमती व शिक्षकांचे कोरोना अहवालात शाळांची घंटा वाजलीच नाही.

अनेक शाळांमध्ये आजही शुकशुकाट आहे. तालुक्‍यातील 9 ते 12वी अखेर 87 शाळांमधून 14 हजार 954 विद्यार्थी शिक्षण घेतात. पैकी आतापर्यंत अवघ्या 26 शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या फक्त 1167 विद्यार्थी शाळेत येत आहेत.

याचा अर्थ 10 टक्केही उपस्थिती नाही. तालुक्‍यात नववी ते बारावीपर्यंत 1098 शिक्षक व शिक्षेकेतर कर्माचारी आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र, त्यातील अनेकांचे अहवाल आठवडा होऊनही आलेले नाहीत. काही ठिकाणी अद्यापही पालक कोरोनामुळे धास्तावलेलेच आहेत. त्यामुळे ते संमतीपत्रे देण्यास इच्छूक नाहीत. 
शिक्षकांची कोरोना चाचणी अहवाल व पालकांच्या संमतीपत्राची अडचण असल्याने अनेक शाळांमधील घंटा वाजलीच नाही. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे शिक्षक शाळेत हजेरी लावत आहेत. मात्र, तालुक्‍यात आतापर्यंत आठ शिक्षक बाधित निघाले आहेत. त्यामुळे ते शिक्षक कार्यरत असलेल्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

शिवाय आठ-आठ दिवस कोरोना चाचणीचा अहवाल येत नसेल, तर हे शिक्षक पुन्हा कोरोना निगेटिव्ह असतील, याची खात्री कोण देणार? त्यामुळे शाळांचा परिसर आजही सुना सुनाच आहे. 

..तर संपूर्ण विद्यार्थ्यांची चाचणी 
अनेक शाळांमधील शिक्षक व मुलेही वेगवेगळ्या गावांहून येत आहेत. अनेक गावात दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अद्याप कोरोना संपलेला नाही. पालक व मुलांमध्येही कोरोनाची भीती कायम आहे. त्या मुळे एखाद्या शाळेत शाळा सुरू झाल्यानंतर, शिक्षक बाधित निघाल्यास संपूर्ण शाळेची चाचणी करावी लागणार आहे. 


चाचणी झालेल्या शिक्षकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. रोज मुलांशी जवळीक येणार आहे, याची जाणीव ठेवून शाळेत यावे. हळुहळू मुलांची उपस्थिती वाढत जाईल. शिक्षक, मुले व पालकांना थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल. लवकरच सर्व काही सुरळीत होईल. 
- बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी, पारनेर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : तापमानाच्या चाळिशीने विदर्भ हैराण; एप्रिल महिन्यात १८ दिवस तापदायक अनुभव

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जमीन मोजणीला शेजारचा विरोध करीत असल्यास काय करावे? मोजणीसाठी ५९० शेतकऱ्यांनी पोलिसांना मोजले ३० लाख रुपये, वाचा...

आजचे राशिभविष्य - 05 मे 2026

खाकीमागे दडलेले संघर्षमय जीवन! आरोपींच्या शोधात वडापावावर काढावे लागतात दिवस; वर्षातील १०० दिवस कुटुंबापासून दूर हजारो किमी प्रवास अन्‌ गाडीतच झोप

रोहित शर्माचे दणक्यात पुनरागमन! ६ चौकार, ७ षटकार... सर्वाधिक ८४ धावा, तरीही मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार रायन रिकल्टनला; असं का?

SCROLL FOR NEXT