The second cycle of political earthquake in Jamkhed tomorrow 
अहिल्यानगर

जामखेडमधील राजकीय भूकंपाचे उद्या दुसरे आवर्तन

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : नगराध्यक्ष निखिल घायतडक आणि दहा नगरसेवक उद्या (शुक्रवारी) भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता हा प्रवेशसोहळा होणार असल्याचे नगराध्यक्ष घायतडक यांनीच "सकाळ'ला सांगितले. 

दहा नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे घायतडक यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. तत्पूर्वी, घायतडक यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाचाही राजीनामा देणार असल्याचे आणि दहा नगरसेवकांनीही राजीनामे दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, आठवडाभरातच या राजीनामानाट्याचे रूपांतर पक्षांतरापर्यंत पोचले.

घायतडक यांना राजीनामा देण्यास सांगितल्याने जामखेडमध्ये राजकारण पेटले आहे. त्यात भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. घायतडक यांच्यासह दहाजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली विकासकामे होतील, याची आशा आहे.

माझ्या नगराध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या काळात सत्ता हाती असूनही माजी मंत्री राम शिंदे एकदाही नगरपालिकेत आले नाहीत

- निखिल घायतडक, नगराध्यक्ष, जामखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणेकरांची पहाट पावसाने उजाडली! साडेसहापर्यंत मुसळधार पाऊस; कोणत्या भागांत कोसळल्या जोरदार सरी?

November 1 New Rules : नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू; गॅस सिलिंडर, दूध, सीएनजी महागले, FASTag मध्येही बदल

Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला! कुठे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको, तर कुठे महिलांचे टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन

LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT