See what starts and what stops at Sangamner 
अहिल्यानगर

संगमनेरात काय सुरू, काय बंद.. पाहा 

आनंद गायकवाड

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने निर्धारित वेळेत व नियमानुसार उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. 

शहरातील कोणत्या प्रभागात, कोणत्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने उघडणार, याबाबत आज नागरिकांमध्ये संभ्रम होता. तहसीलदार अमोल निकम यांनी आज पत्रकाद्वारे माहिती देताना हा संभ्रम दूर केला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचीच दुकाने सुरू होणारी ठिकाणे : नवीन नगर रोड, (इंदिरा गांधी मार्ग), जाणता राजा मार्ग (ओंकारनाथ मालपाणी मार्ग), शिवाजी महाराज पुतळा ते गांधी चौक, मेन रोड (जुना कोल्हार-घोटी रस्ता), कॉलेज रोड (मार्केट यार्ड), जय भारत चौक, नेहरू चौक, बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, अकोले बायपास, पुणे-नाशिक महामार्ग, दिल्ली नाका. 

गर्दी दिसल्यास दुकान "सील' 

इतर भागात पाचपेक्षा अधिक दुकाने बंद राहतील. सर्व ठिकाणी पान व तंबाखूची दुकाने वगळून, सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली राहतील. मात्र, दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. कुठल्याही दुकानासमोर अनावश्‍यक गर्दी दिसल्यास, ते दुकान "सील' करण्यात येईल. तसेच शहरातील कन्टेनमेंट एरिया पूर्णतः बंद ठेवला आहे. 

नेहरू चौकात पुन्हा मोंढा

बाजार समितीच्या आवारातील ठोक भाजीपाला विक्री व्यवस्था (मोंढा) सकाळी पाच ते नऊ या वेळेत भरविण्यात येत होता. मात्र, उद्यापासून (मंगळवारी) ही व्यवस्था पुन्हा शहरातील नेहरू चौकात पूर्वीच्या ठिकाणी सकाळी पाच ते नऊ या वेळेत भरविण्यात येणार आहे. येथे केवळ घाऊक व्यापारी, अधिकृत खरेदीदार, शेतकऱ्यांनाच प्रवेश असेल. किरकोळ भाजीविक्रेत्यांना भाजीपाला विकण्यास मनाई कायम आहे. ग्रामीण भागातील शॉपींग कॉम्प्लेक्‍समधील दुकाने वगळता, इतर सर्व दुकाने (पान व तंबाखू व्यतिरिक्त) सुरू राहतील. अर्थात, तेथेही सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. 

नागरिकांचे सहकार्य हवे

अत्यावश्‍यक सेवा वगळता, इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेत निर्बंध राहिल. कोविडचा लढा जनतेच्या सहकार्याशिवाय जिंकता येणार नाही. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्‍यक गरजेसाठीच घराबाहेर पडा, प्रशासन सज्ज असल्याने काळजी करू नये. परंतु, आवश्‍यक ती दक्षता घरी थांबुनच घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT