The selection process for the new office bearers of Ahmednagar District Primary Teachers Bank has been completed
The selection process for the new office bearers of Ahmednagar District Primary Teachers Bank has been completed  
अहमदनगर

शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी पठाण तर खरात उपाध्यक्षपदी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी नगरपालिका विभागाचे संचालक सलीमखान पठाण यांची, तर उपाध्यक्षपदी राहात्याचे संचालक बाबासाहेब खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आदिवासी 3300 कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ
 
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सभागृहात सहायक निबंधक एस. एल. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी पठाण यांचे नाव संचालक गंगाराम गोडे यांनी सुचविले. त्याला संचालक अनिल भवार यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संचालक किसन खेमनर यांनी सुचविलेल्या बाबासाहेब खरात यांच्या नावाला संचालक सुयोग पवार यांनी अनुमोदन दिले.

मागणी वाढल्याने भाज्यांचे दर कडाडले
 
सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयाचे विक्रम मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना शिक्षक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, संजय चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, अनिल भवार, साहेबराव अनाप, विद्युल्लता आढाव, उषाताई बनकर, अर्जुन शिरसाठ, राजू राहाणे, किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर, गंगाराम गोडे, सुयोग पवार आदी उपस्थित होते.
 
तत्पूर्वी सकाळी गुरुमाऊली मंडळाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी पठाण व उपाध्यक्षपदासाठी खरात यांची नावे अंतिम करण्यात आली. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता कुलट, राजकुमार साळवे, बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, विठ्ठल फुंदे आदी उपस्थित होते. 


 
शिक्षक बॅंकेचे शंभरावे अध्यक्ष व बॅंकेच्या इतिहासात उर्दू माध्यमाचा पहिला अध्यक्ष, तर चाळीस वर्षांनंतर मुस्लिम समाजाचा अध्यक्ष होण्याची संधी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी दिली. विद्यमान संचालक मंडळाने सभासदाभिमुख उत्कृष्ट कारभार केला असून, ती परंपरा कायम राहील. 
- सलीमखान पठाण, नूतन अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT