Senior Congress leader Haribhau Warpe passes away
Senior Congress leader Haribhau Warpe passes away 
अहमदनगर

ज्येष्ठ काँग्रेसचे नेते हरिभाऊ वर्पे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः दिवंगत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांचे निष्ठावंत सहकारी, वारकरी सांप्रदायाचे पाईक, निवृत्ति महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ वर्पे ( वय 87 ), रा. चिकणी, ता. संगमनेर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अनेक वर्षे त्यांनी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमृत उद्योग समुहातील विविध सहकारी संस्थांमधील विविध पदे भुषविताना, संगमनेर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले. तसेच आयुष्यभर वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत त्यांनी निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ट्रस्टचे विश्वस्त पदही सुमारे 30 वर्ष सांभाळले.

निवृत्ती महाराज पालखी व पायी दिंडी समितीचे अध्यक्ष म्हणून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन व नियोजनात त्यांचा मोठा सहभाग असे. वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत ते स्वत: दुचाकी व चारचाकी वाहने चालवीत होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दुध संघाचे संचालक विलास वर्पे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच अमृत उद्योग समूह व संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT