IIT Bombay Sahil Wakode death case Sujat Ambedkar protest
esakal
मुंबई : आयआयटी बॉम्बेचा बी.टेक. विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २३) पवई कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘जस्टिस फॉर साहिल’ आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष आणि कालमर्यादित चौकशी करावी, प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करावे आणि आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.