Senior social activist Anna Hazare has cast his vote at the Gram Panchayat polling station at Ralegan Siddhi..jpg 
अहिल्यानगर

अण्णांनी केले मतदान, उमेदवार पसंत नसेल तर नोटाचे बटन दाबा

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : मतदानाचा हक्क श्रेष्ठ हक्क आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी राज्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन हजारे यांनी आज सकाळी मतदान केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, लोकांची, लोकांकडून व लोकांसाठी चालवलेली अशी आपली लोकशाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावल. सर्व मतदारांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. पसंतीचा उमेदवार नसेल तर नोटाचे बटन दाबा, परंतु प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बजवावा, असेही आवाहन हजारे यांनी केले.

राळेगण सिद्धी ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर आज शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी 11. 30 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे. सोशल डिस्टन्स पाळत व मास्क लावून मतदार मतदानाला येताना येत आहेत. तहसिलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्या पथकासह राळेगणसिद्धी येथील मतदान केंद्राला भेट दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT