Senior social activist Anna Hazare has said that it is necessary to think about the economic and social development of the members  
अहिल्यानगर

पतसंस्था सभासदांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न आवश्यक : अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पतसंस्थेच्या सभासदांची पत कशी वाढविता येईल तसेच सभासदाचा आर्थिक व सामाजिक विकास कसा होईल, असा विचार होणे गरजेचे आहे, असे मत संस्थापक चेअरमन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ते बोलत होते. राळेगणसिद्धीच्या आर्थिक विकासात पतसंस्थेचा वाटा मोलाचा आहे. पतसंस्थानी आर्थिक उन्नतीचा विचार करावा मात्र सभासदांची पत कशी वाढविता येईल हाही विचार होणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी हजारे म्हणाले.

यावेळी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन दादा पठारे, उपायुक्त डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, संस्थेचे संचालक रामचंद्र पठारे, मोहन मापारी, गंगाभाऊ मापारी, महेंद्र गायकवाड, रमेश औटी, दिलीप गव्हाणे आदी या ऑनलाइन सभेत सहभागी होते.
 
पतसंस्थेचे काम अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चांगले सुरू आहे. वीजबिल भरणा केंद्र, सोने तारण, लॉकर अशा सुविधा येथे वाढविल्या तर संस्थेचा आणखी फायदा होईल असे लेखापरिक्षक नवनाथ ठोंबरे म्हणाले. व्यवस्थापक संजय क्षिरसागर, बाळासाहेब पठारे, अनिल उगले, रमेश पठारे, आकाश पठारे, प्रविण कदम आदींनी ऑनलाइन सभा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

SCROLL FOR NEXT