Sensation in Ahmednagar district due to Sujay Vikhe's statement 
अहिल्यानगर

चर्चा तर होणारच ः खासदार विखे म्हणाले, माझं काही खरं नाही...मी कधीही दुसऱ्या पक्षात उडी मारतो

दत्ता उकिरडे

राशीन : राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. मात्र, तरीही विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे या भीषण परिस्थितीतही राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवरून बरेच तर्क-वितर्क काढले जात आहेत. इकडे नगर जिल्ह्यातही खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या बेधडक विधानामुळे खळबळ उडाली आहे.

राशीनमध्ये कोरोनाबाधित आढळल्यानंतर खासदार विखे यांनी तेथे आढावा बैठक घेतली. कोरोनाविषयी लोकांना आवाहन करताना ते म्हणाले, ज्याला जगायचे आहे तोच स्वत:ची काळजी घेईल, ज्याला मरायचे त्याला कोठेही फिरू द्या.  
बैठकीस सरपंच नीलम साळवे, उपसरपंच शंकर देशमुख, युवक नेते राजेंद्र देशमुख, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका वैद्यकीयं अधिकारी डॉ. संदीप पुंड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नेते मोठया संख्येने उपस्थित होते.

अधिकारी नेमणुकीस दिलेल्या ठिकाणी राहत नसल्याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद मैड यांनी लक्ष वेधले. विक्रम राजेभोसले यांनी क्‍वारंटाईन सेंटर भक्तनिवासात हलवण्याची मागणी केली.

रोहित पवारांचे कौतुक 
खासदार डॉ. विखे म्हणाले, प्रशासन, गावकरी सर्वांनी एकदिलाने काम करावे, पाणी,स्नानगृह व शौचालयाची सुविधा असणाऱ्या ठिकाणी क्‍वारंटाईन सेंटर तातडीने हलवा. दुर्देवाने आमच्या पक्षाचे सरकार राज्यात नाही. मात्र, तुम्हांला चांगला निधी आणणारा आमदार मिळाला आहे. सध्या राज्यात त्यांची सत्ता आहे, येथे असणाऱ्या समस्या पत्राद्वारे मी आमदार रोहित पवार यांच्या कानावर घालीन त्यांनी त्या पूर्ण कराव्यात. 

अल्लाउद्दीन काझी म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी कांदे-बटाटयांचे वाटप केले आहे. तुम्ही धान्याचे वाटप करा. यावर विखे म्हणाले, सर्व गावे उघडू द्या.. जातीने येऊन मी माझे कीट वाटणार आहे. कारण लोकांना समजू द्या देणारा कोण आहे नाही तर उद्या दुसराच त्याचे श्रेय घेऊन जाईल. 

मी उडी मारतो......
भाजप-सोबत असलेली शिवसेना ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याचे सांगतानाच डॉ. विखे म्हणाले माझेही काही खरे नाही. मला कोणत्याही पक्षाने डावलले की मी लगेचच त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारतो. असे म्हणताच उपस्थितांशी हसून त्यांना दाद दिली. आता खासदारसाहेबांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांनी रोहित पवार यांना निधी आणणारा आमदार असे संबोधल्याने चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT