sharad pawar criticism on modi in shrigonda need to fight now to preserve democracy sharad pawar Sakal
अहिल्यानगर

Sharad Pawar : श्रीगोंद्यातील सभेत मोदींवर हल्लाबोल; लोकशाही टिकविण्यासाठी आता लढण्याची गरज - शरद पवार

जगात सर्वात प्रबळ असणारी लोकशाही टिकेल की नाही, अशी शंका आता जगभरातील देशांना येऊ लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : जगात सर्वात प्रबळ असणारी लोकशाही टिकेल की नाही, अशी शंका आता जगभरातील देशांना येऊ लागली आहे. आपल्याकडे अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतलेल्या नाहीत. काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबतही हेच चित्र दिसेल.

आता लोकशाही टिकविण्यासाठी लढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज शहरातील संत शेख मंहमद महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे होते.

शरद पवार म्हणाले, तामिळनाडूत एका तर उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीची खात्री नसल्याने पुन्हा पुन्हा सभा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात तब्बल पाच टप्पे पाडून निवडणुकीचे वेळापत्रकच बदलले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील लोकशाहीबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. शेतीमालाला भाव नाही. युवकांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्या हातात सत्ता देऊन चालणार नाही.

नीलेश लंके या सामान्य कुटुंबातील उमेदवाराला संधी द्या. पंतप्रधान मोदी यांना माझे आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. एका सभेत त्यांनी माझा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आहे. आता हा आत्माच त्‍यांच्यापासून जनतेला मुक्त करेल, असा टोला पवार यांनी लगावला.

थोरात म्हणाले, देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. सध्या पंतप्रधान मोदी यांच्या सभा अपयशी ठरत आहेत. फक्त गुजरात राज्यापुरती कांदा निर्यातबंदी हटवून मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्याचे सिद्ध करीत असल्याने त्यांना गुजरातला माघारी पाठवण्याची वेळ आली आहे.

नीलेश लंके म्हणाले, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. या सरकारने दहा वर्षे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडताना केवळ घोषणाबाजी केली. देशाला जातीयवादात ढकलले आहे. श्रीगोंद्यातील घोड, कुकडी आणि विसापूरच्या पाण्याची जबाबदारी आम्ही घेतो.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी केले. आमदार रोहित पवार, जितेश कराळे, माजी आमदार राहुल जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, चंद्रहार पाटील, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, साजन पाचपुते, राजेंद्र फाळके, जयंत वाघ, प्रशांत दरेकर, अनिल कोकाटे, आपचे राजेंद्र नागवडे उपस्थित होते.

तर खोटे बोलण्यासाठी गोल्ड मेडल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षे लोकहिताची कामे असती तर त्यांना आता वणवण फिरण्याची वेळ आली नसती. ते पंतप्रधान नसून प्रचारमंत्री झाले आहेत. त्यांनी सुरुवातीपासून नुसती फेकाफेकी केली आहे. खोटे बोलण्याची स्पर्धा घेतली तर त्यामध्ये मोदींना गोल्ड मेडल मिळेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

कोणालाही उमेदवारी द्या.. पण, त्यांचे काय?

राहुल जगताप म्हणाले, अनेक अडचणी आल्या तरी आम्ही साहेबांना सोडत नाही. आता विधानसभेला महाविकास आघाडीकडून आमच्यातील कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही एकत्र राहू. पण, समोर आमदार बबनराव पाचपुते व नुकतेच त्यांच्या युतीत गेलेले नेते (नागवडे कुटुंब) यांच्यातील कोण उमेदवार आणि कोण त्यांचा सूचक होतोय हे पहायचे आहे, असे म्हणताच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT