sharad pawar for nilesh lanke political meeting over nilwande project sujay vikhe patil
sharad pawar for nilesh lanke political meeting over nilwande project sujay vikhe patil Sakal
अहमदनगर

Rahuri News : निळवंडेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; शरद पवार यांची विखेंवर टीका, राहुरी येथे ‘मविआ’ची सभा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : ‘‘नगर जिल्ह्यात विखेंच्या पिढ्यांनी मागील ५० वर्षांत काय काम केले, जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या बाजूने दत्ता देशमुख यांनी भूमिका मांडली. त्याला विखेंनी विरोध केला. आता सत्ता हातात आल्यावर निळवंडेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

राहुरी कारखाना बंद पाडला. सहकारातील संस्था बंद पाडून खासगी शिक्षण संस्था काढल्या,’’ असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. राहुरी येथे आज (गुरुवारी) महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते.

माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण तनपुरे, राजू आघाव, सुरेश वाबळे, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भिटे, अरुण कडू, अमृत धुमाळ, योगिता राजळे, शशिकांत गाडे आदी होते.

आमदार लंके म्हणाले, की त्यांना विकासाच्या गप्पा करण्याचा अधिकार नाही. विखेंच्या प्रवरा कारखान्यावर ८५० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यांनी गणेश, राहुरी कारखाना, मुळा प्रवरा वीज संस्था, छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पाडले. मतदारांनी माझ्यावर एकदा विश्वास ठेवावा. किरण कडू यांनी आभार मानले. या वेळी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

त्यांनी सभासदांचा विश्वासघात केला ः तनपुरे

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तनपुरे कारखान्यातील भंगार विक्री, अवैध चोरून मुरूम विक्रीची चौकशी केली जाईल. प्रसाद शुगरने ऊस पुरविल्याने दोन वर्षे तनपुरे कारखाना चालला. सभासदांचा विश्वासघात केला. त्यांनी राहुरीला ओळखले नाही. त्यांना मतदार जागा दाखवतील. विधानसभेत मला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा नीलेश लंके यांना जास्त मताधिक्य देऊ, असेही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

क्षणचित्रे

  • सभा मंडप गर्दीने खचाखच भरले.

  • शेकडो लोक भर उन्हात मंडपाबाहेर उभे राहून भाषण ऐकत होते.

  • ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाणाक्ष नजरेतून मंडपाबाहेरील श्रोत्यांची अडचण ओळखली. त्यांना व्यासपीठासमोरील डी झोनच्या मोकळ्या जागेत बसविण्याच्या सूचना दिल्या.

  • सभेनंतर नगर-कोपरगाव रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT