Shevgaon Gram Panchayat Election Sakal
अहिल्यानगर

Gram Panchayat Election : शेवगाव तालुक्यातील २७ गावांच्या रिक्त सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणूक ः सरपंचपद निश्चितीसाठी बैठकांवर जोर

सकाळ वृत्तसेवा

- उद्धव देशमुख

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील २७ गावांच्या रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने प्रत्येक ठिकाणी राजकीय खलबतांना उधान आले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या बोधेगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी सरपंचपद निश्चित झाल्याशिवाय राजकीय गणित आखणे सर्वांनाच जड जाणार आहे.

अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यकाल संपल्याने काही ग्रामपंचायतीत एक तर काही दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत होत्या. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने गेल्या चार दिवसापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने गावातील राजकारणात रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. गावातील चावडी, हॉटेल, ढाबा तसेच पारावर ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

गावात ग्रामपंचायत सदस्य संख्येप्रमाणे त्या सदस्यांची जुळवाजुळव, वार्ड रचना, वार्डमधील मतदाराविषयी काही समज-गैरसमज मतभेद दूर करण्याचे प्रयत्न भावी ग्रामपंचायत सदस्यांकडून केले जात आहेत. जनतेतून सरपंचपदाच्या निवडीमुळे राजकारणात मोठ्याप्रमाणात तरुणांचा सहभाग वाढताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीची ग्रामस्तरावर मोर्चेबांधणी करण्यात गावपुढारी व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी सरपंचपदाचा उमेदवार निश्चित झाल्याशिवाय हे अशक्य आहे.

सहा प्रभागांत १७ सदस्य

बोधेगावमध्ये ६ हजार ८८२ मतदार आहेत. ग्रामपंचायतीचे सहा प्रभाग आहेत. या प्रभागातून १७ सदस्य निवडून येतात. यंदा सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ताब्यात घेण्यसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: 'मिडल ईस्ट सोडा'; अमेरिकेचा नागरिकांना तातडीने प्रदेश सोडण्याचा इशारा, मिडल ईस्टमध्ये पुन्हा संघर्षाचा धोका?

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

SCROLL FOR NEXT