In Shevgaon, 36 applications were rejected 
अहिल्यानगर

शेवगावात ३६जणांचे अर्ज झाले बाद

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : तालुक्‍यात 48 ग्रामपंचायतींच्या 408 जागांसाठी 1332 अर्ज दाखल झाले होते. छाननीत 36 अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार अर्चना भाकड यांनी दिली. 

जातपडताळणी पावती नसणे, अपूर्ण अर्ज भरलेला असणे, बॅंक पासबूक नसणे, शौचालयाचा दाखला नसणे आदी कारणांमुळे 36 अर्ज अवैध ठरले. त्यात सर्वाधिक चापडगावात 6, कोनोशी- 6, वाडगाव-5, हातगाव-3 व ढोरजळगाव-ने येथील 3 अर्ज अवैध झाले. अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जानेवारीपर्यंत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. 

गदेवाडी येथील एका उमेदवाराचे नातेवाईक संभाजी भुजंग मडके हे आज अर्जछाननीच्या वेळी चक्कर येऊन कोसळले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना भाकड व नागरिकांनी तत्परता दाखवित, त्यांना तहसील कार्यालयाच्या वाहनात बसवून रुग्णालयात हलविले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT