In Shevgaon taluka, a grant has been received for crop damage 
अहिल्यानगर

शेवगावला 24 कोटी 23 लाख; दुसऱ्या टप्प्यातील अनुदान, अतिवृष्टीतील पिकांची नुकसान भरपाई

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव (अहमदनगर) : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तालुक्‍यातील 56 गावांसाठी दुसऱ्या टप्प्यात 24 कोटी 23 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही रक्कम त्वरित वर्ग होणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

शेवगाव तालुक्‍यात गेल्या महिन्यात जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. याबाबत आमदार राजळे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 55 गावांसाठी 24 कोटी 23 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. 

तालुक्‍यातील 30 हजार 786 शेतकऱ्यांना त्यातील 23 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. आता 56 गावांसाठी 24 कोटी 23 लाखांचे अनुदान नुकतेच प्राप्त झाले. 23 हजार 762 खातेदारांना 19 कोटी 65 लाख रुपये रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. खातेदार शेतकऱ्यांनी बॅंकेतील अद्ययावत खाते क्रमांक देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना भाकड यांनी केले आहे. 

दोन टप्प्यांचे 48 कोटी 46 लाख अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी तालुक्‍यातील 111 गावांतील 54 हजार 548 खातेदार शेतकऱ्यांसाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून 48 कोटी 46 लाख रुपये प्राप्त झाले. 43 कोटी 88 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT