Shevgaonkar exhausted MSEDCL quarter of four hundred crores 
अहिल्यानगर

शेवगावकरांनी महावितरणचे सव्वा चारशे कोटी थकवले, वीज तोडताच भरण्यासाठी रांगा

सचिन सातपुते

शेवगाव : तालुक्‍यातील 28 हजार 712 कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडे 410 कोटी 64 लाख 59 हजार रुपये तर घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे चार कोटी 75 लाख रुपये अशी 415 कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने महावसुली मोहीम सुरु केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांनी दिली. 
लोहारे म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणतर्फे विविध सवलती दिल्या आहेत. परंतु, तरीही बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाईल. सध्या गहू, हरभरा, ऊस, कांद्यासह फळबागांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. अशातच महावितरणने मागील थकबाकीसाठी तगादा लावल्याने घरगुती, आद्योगिक ग्राहकांबरोबरच कृषी पंपधारकांचे आर्थिक गणित जुळवतांना नाकी नऊ आले आहेत. 
ग्राहकांनी थकबाकी भरावी यासाठी महावितरणने महावसुली अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत थकबाकीच्या रकमेत सवलत, थकबाकीवरील व्याज माफी, विलंब शुल्कात सवलत, हप्त्याने थकबाकी भरण्याचे असे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. सध्या तालुक्‍यात 28 हजार 712 वीजपंप ग्राहकांची संख्या असून त्यांच्याकडे 410 कोटी 64 लाख 59 हजार रुपये थकबाकी आहे. मात्र, सवलतीमुळे 252 कोटी 95 लाख 87 हजार 787 रुपये एवढी रक्कम भरावयाची आहे. एक फेब्रुवारी पासून आजपर्यंत 77 ग्राहकांनी तीन लाख सात हजार रुपये शेतीचे थकीत बील भरुन या मोहीमेस प्रतिसाद दिला आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे एप्रिल 2020 पासून 4 कोटी 75 लाख रुपये थकबाकी आहे. त्यात शहरातील 9 हजार 800 ग्राहकांकडे दोन कोटी 78 लाख थकबाकी आहे. महावितरणने थकीत वीज बिलासाठी दिलेल्या सवलतीचा फायदा घेवून वीज बील भरण्याचे आवाहन लोहारे यांनी केले आहे. 
 

कोरोनाच्या कालावधीत महावितरणने भरमसाठ वीज बिल आकारून ग्राहकांना कोंडीत पकडले. शेतकऱ्यांना वर्षभर फारशी वीजेची गरज पडत नाही. मात्र, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी वीजेची आवश्‍यकता असताना वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही.

- दत्तात्रेय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

SCROLL FOR NEXT