Shirdi Airport Sakal
अहिल्यानगर

Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची निविदा प्रसिद्ध

देश-विदेशातील भाविकांना वरदान ठरू शकणाऱ्या शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची निविदा अखेर प्रसिद्ध झाली.

सकाळ वृत्तसेवा

देश-विदेशातील भाविकांना वरदान ठरू शकणाऱ्या शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची निविदा अखेर प्रसिद्ध झाली.

शिर्डी - देश-विदेशातील भाविकांना वरदान ठरू शकणाऱ्या शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची निविदा अखेर प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचे हे काम दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे.

मागील साडेचार वर्षांपासून या विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग म्हणून पत्र्याच्या शेडचा वापर केला जात आहे. विमानाच्या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांना बसण्यासाठी हे शेड कमी पडते आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांवर तिष्ठत उभे राहण्याची वेळ येते. पाऊस सुरू असताना पत्र्यामुळे मोठा आवाज येतो. उन्हाळ्यात वातानुकूलन यंत्रणेवर ताण येतो. गर्दी वाढली की गोंगाट वाढतो. प्रवाशांच्या बॅगांसाठी आवश्यक कन्व्हेअर बेल्ट, स्कॅनर, सिक्युरिटी चेक-अप या सुविधांसाठी जागेच्या मर्यादा येतात. विमानतळ सुरू होऊन साडेचार वर्षे लोटली, मात्र टर्मिनल बिल्डिंगच्या कामास सुरवात होऊ शकली नव्हती. आता निविदा प्रसिद्ध झाल्याने साईभक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जाणकारांच्या मतानुसार या विमानतळाची उभारणी सुरवातीपासूनच, या कामाचा अनुभव असलेल्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे द्यायला हवी होती. तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, विमानतळ उभारणी आणि संचालनाचा अनुभव नसलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हे काम स्वत:कडेच ठेवले. या विमानतळाच्या कुंपणाच्या भिंतींची परिस्थिती लक्षात घेतली, तर हे काम केंद्राकडे देण्याची गरज लक्षात येते. गेल्या साडेचार वर्षांत हे विमानतळ नावापुरतेच आंतरराष्ट्रीय राहिले. टर्मिनल बिल्डिंगचे कामदेखील सुरू होऊ शकले नाही. आता या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. चांगला ठेकेदार मिळाला आणि वेळेत काम पूर्ण झाले, तर विमानाने येथे ये-जा करणाऱ्या साईभक्तांची गैरसोय दूर होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT