BJP esakal
अहिल्यानगर

Shirdi News : भाजपचे हुकमी एक्के निष्प्रभ

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लाभार्थी मॉडेलचे तब्बल बारा लाख लाभार्थी आहेत, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ठिकठिकाणच्या प्रचारसभेत आवर्जुन करीत होते.

सतीश वैजापूरकर

शिर्डी - सरकारी योजनांचा लाभ थेट घरापर्यंत पोहचवणारे लाभार्थी मॉडेल. पन्ना प्रमुख हे संघटनात्मक बांधणीचे मॉडेल, भाजपचे दोन हुकमी एक्के समजले जात. त्याद्वारे निर्माण झालेला सायलेंट वोटर आम्हाला विजय मिळवून देतो, हा भाजपचा दावा या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात प्रत्यक्षात आला नाही. हुकमी एक्के निष्प्रभ ठरले.

जनसंपर्काचा अभाव, शेतकऱ्यांतला असंतोष आणि ॲन्टी इन्कबन्सी हे मुद्दे प्रभावी ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही खासदार पराभूत झाले. लाभार्थी हे हक्काचे मतदार नसतात. केवळ ॲपद्वारे संघटनात्मक बांधणीला मर्यादा येतात, असा धडा भाजपला शिकायला मिळाला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लाभार्थी मॉडेलचे तब्बल बारा लाख लाभार्थी आहेत, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ठिकठिकाणच्या प्रचारसभेत आवर्जुन करीत होते. दक्षिणेत तर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी फार मोठा खटाटोप करून तब्बल चाळीस हजार कुटूंबांपर्यत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ पोहोचविला. दाळ आणि साखर वाटली.

महिलांना मोठ्या संख्येने देवदर्शन घडवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणून शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवली. त्याद्वारे निर्माण झालेला सायलेंट वोटर मतदार केंद्रावर येईल आणि भाजपला मत देऊन शांतपणे घरी जाईल, असा त्यांचा होरा होता.

प्रत्यक्षात राज्यातील राजकीय घडामोडी आणि मतांचे झालेल्या ध्रुवीकरण यामुळे या सायलेंट वोटरमध्ये विभाजन झाले. त्यातील बरेच लाभार्थी मतदानाला देखील आले नाहीत. खरे तर या लाभार्थ्यांनी भाजपच्या अंदाजानुसार मतदान केले असते तर दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या असत्या. लाभार्थी हक्काचे मतदार होऊ शकत नाहीत.

पन्नाप्रमुख मॉडेल अपयशी

केडर बेस पार्टी असा भाजपचा लौकीक. गेल्या पाच वर्षात नगर जिल्ह्यात बुथ प्रमुख ते पन्नाप्रमुखपर्यतची रचना कागदावर झाली. वातानुकूलीत सभागृहात भाजपच्या बैठकांचा धडाका सुरू होता. मोठमोठे नेते येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे. बैठका थाटात संपन्न व्हायच्या. ॲपद्वारे संघटनात्मक बांधणी सुरू होती. फोटो अपलोड केले की झाले. अशा पध्दतीने संघटनात्मक बांधणी सुरू होती.

पूर्वी तोकडी शक्ती असताना भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मतदान घडवून आणण्यासाठी शर्थ करायचे. सहकाराच्या मुशीत तयार झालेल्या या नव्या भाजपतील कार्यकर्त्यांमध्ये तो जोष दिसलाच नाही. त्यामुळे पन्नाप्रमुख हे मॉडेल देखील अपयशी ठरले.

मतदार गेले कुठे ?

भाजपचे दोन्ही मतदारसंघात हक्काचे मतदार आहेत. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे यांना तर शिर्डीतून शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. त्‍यामुळे मतदार कुठे गेले, असा प्रश्‍न निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT