shirdi congress president sachin chowgule attack loni Ahmednagar crime news  
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : शरद पवारांच्या कार्यक्रमाहून परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

कार्यक्रमाहून परतत असताना सायंकाळी लोणी गावाजवळ अज्ञातांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

रोहित कणसे

काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौगुले यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी गावात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चौगुले यांच्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरने हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या हल्ल्याने अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात मंगळवारी शरद पवार यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सचिन चौगुले उपस्थित होते, याच कार्यक्रमाहून परतत असताना सायंकाळी लोणी गावाजवळ अज्ञातांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सचिन चौगुले आणि सुरेश आरणे यांना संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन चौगुले यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

'हम आपके हैं कौन' साठी कुणाला किती मिळालेलं मानधन? माधुरीला सगळ्यात जास्त तर रीमा लागूंना मिळालेले फक्त...

SCROLL FOR NEXT