शिर्डी ते अहमदनगर या अंतरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दैवाचा फेरा सुरूच आहे.  sakal
अहिल्यानगर

शिर्डी-नगर महामार्गाचे दशावतार संपेना

काम अर्धवट स्थितीत; फेर निविदा काढण्याची ठेकेदाराची मागणी

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी: शिर्डी ते अहमदनगर या अंतरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दैवाचा फेरा सुरूच आहे. कामाची फेरनिविदा काढावी, अशी मागणी करून ठेकेदाराने काम अर्धवट स्थितीत बंद केले. फेरनिविदेसाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. तोपर्यंत ठिकठिकाणी खोदलेला आणि आधीच कमकुवत झालेला हा रस्ता तग धरील का? वाढणाऱ्या अपघातांची आणि त्यात बळी जाणाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी नेमकी कुणाची? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय हरित लवादाची स्टोन क्रशर सुरू करण्याची परवानगी नसल्याने ठेकेदाराने फेरनिविदेची मागणी करून काम बंद केले. त्याच्या मागणीचा विचार करायचा किंवा नाही, हे राष्ट्रीय महामार्गाचे दिल्ली कार्यालय ठरवेल. ठेकेदाराची अनामत रक्कम ताब्यात घेण्यासह इतर बरेच कायदेशीर मार्ग आहेत. ठेकेदार सांगतो म्हणून फेरनिवादेचा पर्याय स्वीकारला जाईलच, असे नाही.

राष्ट्रीय हरित लवादाने सर्वच ठेकेदार कंपन्यांना स्टोन क्रशर चालविण्याची परवानगी घेण्यास सांगितले आहे. या लवादास न्याय प्राधिकरणाचा दर्जा असल्याने ही परवानगी सहजासहजी आणि लवकर मिळणे शक्य नाही. खोदलेला रस्ता बुजवा, असे आदेश अधिकाऱ्यांनी ठेकेदार दिले. मात्र खडी तयार करायला परवानगी नाही, मग तो कसा बुजविणार, अशी भूमिका घेत त्याने काम बंद केले. थोडक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेला खेळखंडोबा नव्या जोमाने पुन्हा सुरू झाला. पुढील पंधरवाड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता असताना अद्यापतरी खोदलेला रस्ता बुजविण्याचे काम सुरू झालेले नाही. खोदलेला भाग केवळ बुजवून चालणार नाही, तर तो शेजारच्या रस्त्यासारखा पक्का करावा लागेल. तरच त्यावरून जड वाहतूक सुरू राहील.

पंधरा दिवसांत काम पूर्ण होईल का?

शिर्डी ते अहमदनगर या अंतरात ठिकठिकाणी एकूण दहा किलोमीटर लांबीचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. तो मजबुत करून डांबरीकरण करावे लागेल. जे काम चार-पाच महिन्यांत झाले नाही, ते पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करायला ठेकेदार राजी होईल का, हा खरा प्रश्न आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT