Shirdi News 
अहिल्यानगर

Shirdi News: शिर्डीत साई भक्त अन् सुरक्षा रक्षकामध्ये तुफान हाणामारी; काय घडलंय वाचा?

या प्रकरणात सुरक्षा रक्षकाकडून समोरच्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिर्डीमध्ये साई संस्थान परिसरात साई भक्त आणि सुरक्षा रक्षकामध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिरात जाण्यापासून रोखल्यानं हा वाद पेटल्याचं सांगितलं जात आहे. या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Shirdi News Clash between Sai Devotees and Security Guards Read what happened)

काय घडलं नक्की?

शिर्डीतील साई संस्थानमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या काळात देशभरातून मोठ्या प्रमाणावर पालख्या शिर्डीत येत असतात. त्यानुसार यंदाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आज या उत्सवाची सांगता असून या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. यातच मुंबईची साईलीला पारखी ही गेट क्रमांक पाचमधून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर या पालखीतील भाविकांचं काहीतरी सामान आतमध्ये राहिलं, त्यामुळं एकानं ते आणण्यासाठी या गेटमधून पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुरक्षा रक्षकानं रोखलं, त्यातून वाद निर्माण झाला.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यानंतर हा किरकोळ वाद विकोपाला गेला त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर मंदिर परिसरात काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिर्डीत अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सुरक्षारक्षकातून वादातून अशा हाणामाऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT