निळवंडे’साठी ३६५ कोटींची तरतूद sakal
अहिल्यानगर

शिर्डी : ‘निळवंडे’साठी ३६५ कोटींची तरतूद

दुष्काळी पट्ट्यातील कालव्यांसाठी निधी; या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी मिळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी: उत्तर नगर जिल्ह्यातील वर्षानुवर्षे तहानलेल्या दोन लाख एकर कोरडवाहू क्षेत्रातील काळ्या आईची कूस उजवण्यासाठी महाविकास आघाडीने या अर्थसंकल्पात तब्बल तीनशे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून निळवंडे कालव्यांचे काम पूर्ण होईल. येत्या पावसाळ्यात कालव्यातून पाणी वाहू लागेल. दुष्काळी टापूत निळवंडेच्या पाण्यामुळे हरितक्रांतीची पहाट उगवेल. त्यामुळे ही माहिती समजताच, दुष्काळाने पिचलेल्या या भागातील शेतक-यांच्या चेह-यांवर हसू फुलले. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत तब्बल नऊशे छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद केल्याने निळवंडे कालव्यांच्या कामास गती मिळाली. कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने, या धरणात गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात आठ टीएमसी पाणी साठते. दुष्काळी लाभक्षेत्र कोरडे ठाक आणि धरणाचे पाणी प्रवरा कालव्यात, अशी अन्यायकारक स्थिती निर्माण झाली होती.

वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या जून महिन्यात या कालव्यातून पाणी सोडून चाचणी घेतली जाईल. पुढील दीड वर्षात प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी जाईल, साठवण बंधारेदेखील भरता येतील. उजव्या- डाव्या कालव्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामे पुढील चार महिन्यांत वेगाने पूर्ण होतील. या कामात कुठलाही आणि कसलाही अडथळा नाही. निळवंडे कृतिसमितीचे अध्यक्ष नानासाहेब जवरे म्हणाले, की आमच्या न्यायालयीन लढाईला यश आले आहे. महाविकास आघाडीने सलग दुस-या वर्षी मोठा निधी दिला.

निळवंडे कालव्यांसाठी निधी मिळावा, याकरिता आपण उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. कोविड प्रकोपाच्या काळातही महाविकास आघाडीने भरीव तरतूद केल्याने निळवंडे कालव्यांचे काम आता पूर्ण होणार आहे. यंदाची ३६५ कोटी रुपयांची तरतूद म्हणजे लाभक्षेत्रात येत्या पावसाळ्यात पाणी नेण्याची हमी, असे म्हणता येईल.

- आमदार आशुतोष काळे,अध्यक्ष, साईसंस्थान, शिर्डी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सदाशिव लोखंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार प्रसाद तनपुरे, मंत्री प्राजक्त तनपुरे या सर्वांच्याच सहकार्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कालव्यांच्या कामावर भरीव तरतूद झाली. आम्ही गेल्या वीस वर्षांपासून याप्रश्नी संघर्ष करतो आहोत. येत्या पावसाळ्यात आमचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

- नानासाहेब शेळके, अध्यक्ष, निळवंडे कृतिसमिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच वेळी पाच न्यायाधीशांची घरे फोडली; कर्मचाऱ्यांच्या घरांनाही केले लक्ष्य, किती ऐवज लंपास?

Marathi Folktale : एक होता कावळा, एक होती चिमणी..! तब्बल 2 हजार वर्षे जुनी गोष्ट, यामागे दडलेला रोचक इतिहास नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

SCROLL FOR NEXT