Shirdi Saibaba sakal
अहिल्यानगर

Shirdi Saibaba : बदलत्या हवामानाचा साईनगरीला फटका

भाविकांच्या सर्वाधिक गर्दीचा महिना, अशी ओळख असलेल्या मे महिन्याच्या प्रारंभीच साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची गर्दी आटली.

सतीश वैजापूरकर

भाविकांच्या सर्वाधिक गर्दीचा महिना, अशी ओळख असलेल्या मे महिन्याच्या प्रारंभीच साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची गर्दी आटली.

शिर्डी - भाविकांच्या सर्वाधिक गर्दीचा महिना, अशी ओळख असलेल्या मे महिन्याच्या प्रारंभीच साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची गर्दी आटली. दरवर्षीच्या तुलनेत तीत तीस ते पस्तीस टक्क्यांची घट झाली. येथील आर्थिक उलाढालीवर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसायला सुरवात झाली. तुलनेत अन्य धार्मिक आणि पर्यटनस्थळांवरील गर्दीदेखील रोडावली आहे. कडाक्याचे ऊन, असह्य उकाडा आणि वादळी वाऱ्यांसह येणारा अवकाळी पाऊस, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असा कयास आहे.

संगमनेर येथील मालपाणी परिवाराने येथे साईतीर्थ थीम पार्क आणि वॉटर पार्कची उभारणी केली आहे. या दोन्ही प्रकल्पांचे व्यवस्थापक डॉ. संतोष खेडलेकर याबाबत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की यंदा एप्रिल महिन्यापर्यंत शिर्डीत भाविकांची गर्दी टिकून होती. सुट्यांच्या काळात अपेक्षेहून कितीतरी अधिक गर्दी झाली, मात्र गेल्या दोन मेपासून गर्दीचा भर ओसरण्यास सुरवात झाली.

आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आणि त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्येची नोंद असते. साईदर्शनाला आलेले भाविकच आमच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. आमच्याकडे नोंदलेली संख्या लक्षात घेतली, तर गर्दीत तुलनेत तब्बल तीस ते पस्तीस टक्क्यांची घट झाली. ही घट तशी काळजी करायला लावणारी आहे. बदलत्या हवामानाचा धार्मिक पर्यटनालादेखील मोठा फटका बसला आहे. आमचे लोणावळ्यातदेखील वॉटर पार्क आहे. तेथेही गर्दी कमी आहे.

गेल्या आठ दिवसांपासून भाविकांची गर्दी रोडावल्याने येथील हॉटेल व्यवसाय आणि अन्य बाजारपेठेवरदेखील प्रतिकूल परिणाम झाला आहे. गर्दीचा भर आणि आर्थिक उलाढालीत मोठी वाढ अपेक्षित असताना शिर्डीत गर्दीअभावी गेल्या आठ दिवसांपासून शुकशुकाट जाणवतो आहे. तथापि, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांची गर्दी तुलनेत टिकून असल्याने, निदान शिर्डीतील रस्त्यांवर वर्दळ तरी जाणवते आहे.

शेजारी कर्नाटकात निवडणुकीची धामधूम गेला आठवडाभर सुरू होती. त्यामुळे बंगळुरू येथून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत घट झाली. मात्र, कडाक्याचे ऊन आणि वादळी पाऊस, यामुळे भाविक आणि पर्यटक घराबाहेर पडायला तयार नाहीत, हे गर्दी रोडावण्यामागचे मुख्य कारण असावे.

- डॉ. संतोष खेडलेकर, व्यवस्थापक, साई थीम पार्क, शिर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT