MLA Video Sakal
अहिल्यानगर

MLA Prajakt Tanpure : 'शासन आपल्या दारी'मुळे ST बस रद्द! पवार गटाच्या आमदाराने विद्यार्थ्यांना पोहचवले शाळेत

दत्ता लवांडे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमासाठी नेण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.

पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या गाडीतून शाळेत सोडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"'शासन आपल्या दारी' या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!" असं कॅप्शन टाकून तनपुरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Notice

दरम्यान, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज शिर्डी येथे होणार आहे. तर यासाठी संगमनेर येथून सुटणाऱ्या बसेस आणि मुक्कामी बसची सेवा कालपासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीस संगमनेर एसटी स्टँडवर लावण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेर आगाराच्या जवळपास ६३ बस सोडण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT