In Shirdi, three people killed a beggar for money 
अहिल्यानगर

ब्रेकिंग ः शिर्डीत भिकाऱ्याकडील घबाडासाठी तिघांनी केलं असं कृत्य

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : साईंबाबा हे अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जात. त्यांच्या आश्रयाला आलेल्या सर्वांना ते प्रेमाने वागवित. त्यांच्या चरणावर सत्ताधीश राज्य अर्पण करायलाही तयार असत. परंतु बाबांना कोणाच्या द्रव्याला हात लावला नाही. फकीर म्हणूनच त्यांनी ओळख आहे. त्यांच्या पश्चात शिर्डीला श्रीमंती आली. शिर्डीत पैसा दिसायला लागल्यावर उद्योगधंदे वाढले. भाविकांसोबत इथे भिक्षेकर्यांचीही संख्या वाढली. तेही मालामाल होऊ लागले. या फकिराच्या नगरीने सर्वांनाच धनिक बनवले. त्या भिकेकरीही आले.

काल बाबांच्या या नगरीत एका भिकाऱ्याचा खून झाला होता. शहरातील बसस्थानकासमोरील शौचालयात झालेल्या खुनाचे गूढ पोलिसांनी उकलले. साईमंदिर परिसरात भिक्षा मागणाऱ्या तिघांनी पैशासाठी शौचालयात नेऊन पेव्हिंग ब्लॉकने मारहाण करून हा खून केल्याचे समोर आले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपींनी दिली. शंकर ऊर्फ अण्णा, असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

राजेंद्र गोविंद गवळी (वय 30, रा. साठेनगर, ता. घनसांगवी, जि. जालना), सुनील महादेव कांबळे (वय 21, रा. शिंगणापूर, ता. जत, जि. सांगली) व सुनील शिवाजी जाधव (वय 30, रा. सोनारवाडा, ता. बार्शी, सोलापूर), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 
शिर्डी बसस्थानकासमोरील शौचालयात काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनीच त्याचा खून झाल्याचे दिसत होते. मृताची ओळख स्पष्ट होऊ नये, यासाठी त्याचा चेहरा विद्रूप केला होता. याबाबत शिर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिर्डी पोलिसांनी तपास केला. शिर्डी परिसरातील सर्व भिक्षेकऱ्यांना जमवून माहिती घेतली. त्या वेळी मृत व्यक्ती व आरोपींची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिर्डीतून वरील आरोपींना ताब्यात घेतले. तपासात, पैशासाठी हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT