Shiv Sena has filed applications from various constituencies for entry in ahmednagar district co operative bank through elections : 
अहिल्यानगर

नगर जिल्हा बॅंकेत 'एन्ट्री'साठी शिवसेना सक्रीय

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेत निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने 'एन्ट्री' करण्यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्याबरोबर शिवसेनाही सक्रीयपणे रिंगणात उतरणार आहे.

बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र चेतन लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, माजी महापौर भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून, तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, काशिनाथ दाते, दत्ता जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बॅंकेत संचालक असणे आवश्‍यक : लोखंडे 

राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. जिल्हा बॅंकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळेल, असा विश्‍वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

SCROLL FOR NEXT