अहिल्यानगर

Sharad Pawar: लंकेंच्या विजयात आमचाही वाटा; पवारांच्या जागेवर ठाकरेंचा दावा!

Shusma Andhare: सुषमा अंधारे; पारनेरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Nilesh Lanke Latest News: रात्रीच्या अंधारात ४० गद्दार पळून गेले, हा राज्याच्या अस्मितेला कलंक आहे. तो धुवून काढण्यासाठी राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे. मागील अडीच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत.

विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जात आहे. हे सरकार निवडणुकीस घाबरत आहे, अशी टीका शिवसेने ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले.

येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व शिवसेनेतर्फे आयोजित महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, डॉ. भास्कर शिरोळे, सुवर्णा वाळुंज, प्रियंका खिलारी, रवी वाकळे, किसन सुपेकर, अनिल शेटे, गुलाबराव नवले, अॅड. कृष्णा जगदाळे, कोमल भंडारी, डॉ. पद्मजा पठारे, राजू शेख, संतोष येवले, शरद झोडगे, सुनीता मुळे आदी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या की, राज्याची अस्मिता वाचविण्यासाठी पक्ष फोड्या भाजपचा पराभव करणे गरजेचे होते, म्हणून आम्ही एकदिलाने खासदार नीलेश लंके यांना निवडून दिले. यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे.

त्यावेळी पारनेरची जागा शिवसेनेला देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता पारनेरची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी मी श्रेष्ठींना साकडे घालणार आहे. पारनेरची जागा आपणच घेणार आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात दिलेला शब्द पाळावा.

डॉ. पठारे म्हणाले की, पारनेर ही शिवसैनिकांनी खाण आहे. शिवसैनिकांवर झालेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत केली. तालुक्यात शिवसेनेची ८० हजार मते आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आघाडीच्या नेत्यांनी पाळावा व पारनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी.

सर्व सामान्यांना हवाहवासा असणारा उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीने जाहीर करावा, तसेच पारनेरची अस्मिता जागी ठेवण्यासाठी ही जागा शिवसेनेला मिळावी. उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही शिवसैनिक कोठेही कमी पडणार नाही.

- संदेश कार्ले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

विरोधकांना लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची किमत लक्षात आली. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, आम्ही बहिणी विरोधकांच्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत. आम्हाला कुबड्या नकोत स्वाभिमान हवा. बेटी बचाव कायदा आणि महिलांना सुरक्षा हवी मदत नको.

- सुवर्णा वाळुंज, प्रवक्त्या, शिवसेना ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT