Shocking: Former corporator Digambar Dhawan dies of heart attack 
अहिल्यानगर

धक्कादायक ः माजी नगरसेवक दिगंबर ढवण उर्फ महाराज यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः सावेडीतील माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे आज रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती वार्यासारखी सावेडी उपनगरात तसेच शहरात पसरली.

ते महाराज या टोपण नावाने परिचित होते. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा लौकिक होता. माजी आमदार अनिल राठोड यांची सावेडीतील धुरा त्यांच्याकडेच होती. मोबाईल नगरसेवक म्हणूनही ते ओळखले जायचे. तपोवन रस्ता परिसरातील ढवण वस्ती हा त्यांचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीवेळी ते शिवसेनेपासून काहीसे दुरावले होते. त्यावेळी घेतलेला मेळावा अभूतपूर्व होता.

प्रभागातील कामे करून घेण्यासाठी ते जिवाचे रान करीत. महापालिकेत त्यांनी घोड्यावर जाऊन केलेले आंदोलन खूप गाजले. लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. त्यांची पत्नी शारदाताई यांनीही प्रभागाची धुरा सांभाळली होती.

सायंकाळी ते फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा लोकसंग्रह केला होता.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांना कधी मिळणार डिस्चार्ज? डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट...

IDFC Bank News: IDFC First Bank ला मोठा धक्का! शेअर तब्बल 20 टक्क्यांनी कोसळला! कारण काय?

Latest Marathi News Live Update : नाशिक स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत येणार ट्विस्ट

Sandeep Mahale : शहीद जवान संदीप महाले यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, 3 वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी

Success Story: उकिरड्यावरून लेखकापर्यंतचा प्रवास; बबन माने यांची प्रेरणादायी कथा

SCROLL FOR NEXT