द्वारकामाईत sakal
अहिल्यानगर

शिर्डीत साईंच्या दरबारात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पूजन

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी: श्री रामनवमीनिमित्त द्वारकामाईत ठेवण्यात येणाऱ्या गव्हाच्या पोत्याचे पूजन साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. साईसंस्थानचे अध्यक्ष व संतकवी दासगणू महाराज यांनी रचलेले श्री राम जन्माख्यान व पाळणा कीर्तनकार विक्रम महाराज नांदेडकर यांनी सादर केला. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पाळण्याची दोरी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी ओढली. प्रभू रामचंद्र आणि साईनामाचा जयजयकार करीत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज (रविवारी) साईंच्या दरबारात श्रीरामजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.

दासगणू महाराज हे साईंचे आवडते कीर्तनकार. त्यांनी रचलेले श्रीराम जन्माख्यान नारदीय कीर्तनपरंपरेत महत्त्वाचे समजले जाते. त्यातील

रघुराया, भक्तवत्सला,

सदया, बाळा जो जो रे...

हा पाळणा नांदेडकर महाराजांनी सादर केला. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पाळण्यात बाल रामाची प्रतिमा ठेवण्यात आली. पाळण्याची दोरी बाणाईत यांनी ओढली. साईमंदिरा जवळील व्यासपीठावरपान संपन्न झालेल्या या श्रीरामजन्म सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी द्वारकामाई मंदिरातील गव्हाचे पोते बदलले जाते. या नव्या पोत्याचे पूजन साईसंस्थानचे अध्यक्ष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाणाईत, उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत, विश्वस्त सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, अविनाश दंडवते, अॅड. सुहास आहेर, अनुराधा आदिक, जयंत जाधव, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

द्वारकामाई मंदिरावर नवे निशाण लावण्याची प्रथा आहे. अहमदनगरचे रासने व निमोणचे देशपांडे कुटुंबीयांना हा मान आहे. आज या निशाणाचे विधीवत पूजन करून त्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ते द्वारकामाईवर फडकविण्यात आले. आज पहाटे द्वारकामाई मंदिरातील साईचरित्र पारायण सोहळ्याची सांगता झाली. साईंच्या पोथीची व प्रतिमेची तेथून निघालेली मिरवणूक गुरूस्थानमार्गे साईमंदिरात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

आजींची जय-वीरू जोडी! 87 वर्षांच्या मंदाबेन आणि उषाबेन ‘बाइकर आजी’ म्हणून प्रसिद्ध, viral Video

Pune Accident : पुण्यात शिक्षिकेचा अपघाती मृत्यू, मुख्यमंत्र्यांसाठी ट्रॅफिक वळवल्यामुळे मदत पोहचू शकली नाही ? वसंत मोरेंचा घणाघात

Latest Marathi News Live Update : जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT