गॅस वाहिनी sakal
अहिल्यानगर

श्रीगोंदे : रस्ते तोडून जाणार गॅस वाहिनी

श्रीगोंदे पालिकेला सात कोटी नुकसान भरपाईचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : शहरातून जाणाऱ्या गॅस वाहिनीसाठी आता रस्ते खोदण्यात येणार आहेत. मांडगवण रस्ता ते शनी चौक व बाह्यवळण रस्ता त्यासाठी खोदण्यात येणार असून भरपाईपोटी संबधीतांनी पालिकेला सात कोटींची निधी देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. मांडवगण रस्त्याला येवून थांबवलेली व काष्टी रस्त्यापर्यंत शहराच्या हद्दीतून जाणारी ही वाहिनीला पालिका प्रशासन मार्गस्थ करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी पालिका व गॅस वाहिनी ठेकेदार यांच्यातील प्राथमिक चर्चेनुसार, मांडवगण रस्त्यापासून जोतपूर मारुती चौकातून शनीचौकापर्यंत रस्ता खोदून ही वाहिनी टाकली जाईल. पुढे पारगाव रस्त्याच्या बाजूने बाह्यवळण रस्त्याने सरस्वती नदीच्या बाजूने ती काष्टी रस्त्याकडे रवाना केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील दुभाजक असणारे रस्ते निवडण्यात आले आहेत. मांडवगण ते शनी चौक व बाह्यवळण दोन्ही रस्त्यांना दुभाजक आहेत.

शहराकडच्या बाजूच्या रस्त्याला ही वाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येणार आहेत. या दोन्ही रस्त्यांवरुन वाहिनी जाण्यासाठी यापुर्वीच ठेकेदार प्रयत्न करीत होते.

तथापि पालिका राजी होत नव्हती. काही महिन्यांपुर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी नुकसान भरपाई देणार होते. मात्र आता हा आकडा सात कोटींवर गेला आहे. दरम्यान शहरातील अतिक्रमण काढण्याचा व गॅस वाहिनीचा संबध अजून स्पष्ट होत नसला तरी जामखेड ते काष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने जाणारा मार्ग साफ करण्यात आला. त्याचा फायदा नक्कीच गॅस वाहिनी टाकताना होणार आहे.

सरस्वती नदीचा तिढा

सरस्वती नदीच्या बाजूने गॅस वाहिनी नेण्याचा प्रयत्न होवू शकतो. मात्र त्याला पालिका मंजूरी देत नाही. शिवाय नदीच्या पुलाच्या बाजूने टाकलेली वाहिनीसाठी पालिकेची परवानगी नसल्याची माहिती आहे.

गॅस वाहिनी टाकण्यासाठी अतिक्रमणे काढली हे चुकीचे आहे. ही वाहिनी रस्ता खोदून आणताना त्यापोटी सात कोटीची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पालिका सभागृहात मांडला जावून तेथे मंजूरी मिळाली तरच परवानगी दिली जाईल. सरस्वती नदीच्या पुलाच्या बाजूने वाहिनी टाकताना परवानगी घेतलेली नाही.

- मंगेश देवरे, मुख्याधिकारी, श्रीगोंदे नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT