Aashadhi Ekadashi Sakal
अहिल्यानगर

Aashadhi Ekadashi : ईदच्‍या दिवशी ‘आषाढी’मुळे कुर्बानी नाहीच! 'पंढरपूर'नंतर 'या' गावचाही ऐतिहासिक निर्णय

मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर : मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद व हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

बेलापूर येथे नुकतीच शांतता समितीची बैठक झाली. त्यात सर्व मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे हिंदू बांधव तसेच पोलिस प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर येथील मुस्लीम बांधवानेही हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दोनही सण एकाच दिवशी येत असल्याने यादिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलिस प्रशासनातर्फे काही सूचना करण्याच्या अगोदरच मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी हा हिंदू बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे.

या दिवशी सर्व हिंदू बांधव पूजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरी ईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी सर्वानुमते घेतला असल्याचे ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख, अजीज शेख यांनी सांगितले. या निर्णयांचे हिंदु बांधव व पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, अरुण नाईक, प्रफुल्ल डावरे, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई, अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदींनी मनोगत व्यक्त केले. रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख, रमेश आमोलीक, मिस्टर शेलार, जिना शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT